मोफत ई रिक्षासाठी तुम्ही अर्ज केला का? Divyang Apang Rikshaw Vatap Yojana 2024

मोफत ई रिक्षासाठी तुम्ही अर्ज केला का? Divyang Apang Rikshaw Vatap Yojana 2024

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे त्यांना शासनामार्फत 100% टक्के अनुदानावर इलेक्ट्रॉनिक तीन चाकी रिक्षा मिळणार आहे!
Divyang E-Riksha Yojana Maharashtra 2024

Divyang E-Riksha Yojana Maharashtra:

  दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सुख आणि सोयी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना रोजगाराची निर्मिती करून देणे करिता शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे व त्यांना रोजगार निर्मिती करून देणे. त्यांच्या कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे यासाठी सदरची योजना राबवली जात आहे.

कोणाला मिळते मोफत ई - रिक्षा (eligibility for e-rickshaw Yojana):

  • या योजनेसाठी लाभार्थी हा 40 टक्के दिव्यांग असला पाहिजे
  • लाभार्थी हा 18 ते 55 वयोगटातील असला पाहिजे
  • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न अडीच लाखात पर्यंतच असावे
  •  जास्तीत जास्त अपंग असलेल्या प्राधान्य दिले जाईल
  • तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • लाभार्थी यांच्याकडे दिव्यांगाची UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक अर्ज करण्यासाठी पालक अर्ज करू शकतील.
  • अर्जदार शासकीय किंवा निवास शासकीय किंवा महामंडळ यांचा कर्मचारी नसावा.
  दिव्यांग व्यक्तींना महाराष्ट्र दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत 100% अनुदान तत्त्वावर दिव्यांग व्यक्तींना त्यांचा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करून त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे काम या सरकारी योजना मार्फत करण्यात येत आहे.

मोफत ई-रिक्षा साठी अर्ज करण्याची मुदत काय? (Last date to apply for free e-rickshaw Yojana):

 महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना शंभर टक्के अनुदानावर अपंगांना रिक्षा दिली जात आहे. सदर योजनेचा लाभ हा दिव्यांग व्यक्ती घेऊ शकतो त्यासाठी पात्रता वर दिलेली आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया ही 3 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे आणि अंतिम तारीख ही 5 जानेवारी 2024 ही आहे.
लाभार्थी यांनी 05 जानेवारी 2024 च्या आत मध्ये आपला अर्ज ऑनलाईन करायचा आहे
दिव्यांग रिक्षावाटप योजना 2024

दिव्यांग ई रिक्षावाटप योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे? Important document for free e rickshaw Yojana Maharashtra?:

  • लाभार्थी यांचे पासपोर्ट साईज फोटो
  • लाभार्थी यांचा जातीचा दाखला
  • लाभार्थी अधिवास प्रमाणपत्र
  • लाभार्थी निवासी पुरावा
  • लाभार्थी यांना मिळालेले दिव्यांगाचे प्रमाणपत्र
  • UDID प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक चे झेरॉक्स
  • लाभार्थी यांचे प्रतिज्ञापत्र

How to apply for divyanka mukhat Shiksha Yojana 2024 (दिव्यांग रिक्षावाला योजनेसाठी अर्ज कसा करावा लागेल?)

  • लाभार्थी यांनी प्रथम महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर वाचून घ्यावा त्याची लिंक खाली दिलेली आहे
  • तसेच लाभार्थी यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ती सुद्धा लिंक खाली दिलेली आहे
  • प्रथम वापरकर्त्याची नोंदणी करावी
  • पोर्टलवर लॉगिन करावे लागेल
  • दिलेल्या अर्ज तपासून भरून घ्यावा आणि सबमिट करावा
  • लाभार्थ्यांनी अर्ज सबमिट केल्यानंतर एक अर्ज ऑनलाईन सबमिट केलेली सबमिशन ची पोस्ट पावती त्यांच्याजवळ जपून ठेवायला पाहिजे.

दिव्यांग रिक्षा वाटप योजनेमार्फत कोणकोणते व्यवसाय करता येतील?

  • दिव्यांग व्यक्ती हा विविध खाद्यपदार्थ विकू शकतो
  • किराणा भुसार, पूजेचे साहित्य, आवश्यक डेली स्टेशनरी, वस्तू भांडार, भाजीपाला, फळांचे दुकान.
  • वाहतूक व्यवसाय झेरॉक्स सेंटर अशा प्रकारचे विविध व्यवसाय परीक्षा मार्फत अपंग दिव्यांग व्यक्ती या रिक्षावाटप योजनेमार्फत करू शकतो.

लाभार्थी यांना अर्ज भरता येईना?

महाराष्ट्र दिव्यांग वित्तविकास महामंडळामार्फत शंभर टक्के अनुदानावर अपंगांना इ रिक्षा मिळण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज येत आहेत. त्यामुळे महामंडळाची अधिकृत सांकेतिक स्थळ हे स्लो चालत आहे त्यामुळे अर्ज भरल्यानंतर सबमिट होण्यास विलंब होत आहे. सदरच्या समस्येमुळे लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाकडून मुदत वाढ मिळू शकते आणि त्याची मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र दिव्यांग मोफत ई रिक्षा योजनेसाठी महाराष्ट्रातून 03 डिसेंबर पासून अर्ज भरणे सुरू झाले आहेत आणि अंतिम तारीख ही शासनामार्फत 05 जानेवारी ठेवण्यात आलेली आहे.

आमच्या अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट साठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद.....
- अश्विनी चौधरी (ब्लॉग राइटर)

Post a Comment

0 Comments

close