सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! प्रतीक्षा संपली, उद्या मोठी बातमी मिळणार, वाचा अपडेट्स
Govt Employees Salary DA :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे त्यांना आता महागाई भत्ता 04 टक्के वाढीसह 42 टक्के देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. सदरची घोषणा शुक्रवारी होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार सदरच्या निर्णयाला मंजुरी देणार आहे.
मागील दोन महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात कधी वाढ होणार याविषयी सतत चर्चा सुरू आहे परंतु निश्चित तारीख करण्यात आली नाही. सदरची घोषणा होळीच्या जवळपास होणार होती परंतु मंत्रिमंडळाची बैठक न झाल्यामुळे आता उद्या दिनांक 17 मार्च 2023 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीसह एकूण 42 टक्के देण्यास केंद्र सरकार मान्यता देणार आहे.
4 टक्के महागाई भत्ता मंजूर (4% dearness allowance)
केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी 04 टक्के महागाई भत्ता मंजूर करणे बाबत बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक ही प्रस्तावित होती. परंतु सदरची बैठकी काही कारणास्तव झाली नाही. त्यामुळे 04 टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर करणे बाबत शुक्रवारी दिनांक 17 मार्च रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक ठेवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये महागाई भत्ता मंजूर करणे बाबत चा महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे.
- हे सुद्धा वाचा :- केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता न देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय!
- जुनी पेन्शन नाही.. तर NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी 14 मार्च 23 शासन निर्णय निर्गमित ....!
- Old pension strike ! अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात..
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या वाढीवर केंद्र सरकार शिक्का मोर्तब करू शकते. त्याचप्रमाणे जानेवारी पूर्वी 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. आता 42 टक्के दराने महागाई भत्ता देणे बाबत केंद्र सरकार उद्या शुक्रवारच्या बैठकीमध्ये निर्णय घेणार आहे.
केंद्र सरकारची अधिसूचना जाहीर होणार ( Central government staff 4% increase dearness allowance)
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या पगारामध्ये ४% टक्के दराने जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचा महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
म्हणजेच 18 हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा 750 रुपयाची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे थकबाकी सुद्धा मिळणार आहे.
पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ.
नुकत्याच झालेल्या लोकसभा अधिवेशनामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागील 18 महिन्याची थकबाकी देणे बाबत नकार दिलेला आहे. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चार टक्के दराने महागाई भत्ता मिळत असल्याने सकारात्मक बाप दिसत आहे. सदरच्या निर्णयामुळे पेन्शनधारकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे.
- महागाई भत्ता 34%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..!
- Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment