जुनी पेन्शन नाही.. तर NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी 14 मार्च 23 शासन निर्णय निर्गमित ....!

जुनी पेन्शन नाही.. तर NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी 14 मार्च 23 शासन निर्णय निर्गमित ....!

Old pension scheme state employees strike latest update

Old Pension strike:- 

     जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सध्या राज्य सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर आहेत. त्यावर सरकारने तात्काळ निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये नमूद आहे की जुनी पेन्शन नाही तर NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत .. चा शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2023 रोजी निर्गमित केलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे.

Maharashtra state employees strike for old pension scheme:

👉👉👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈

शासन निर्णय :-

        राज्य शासनाच्या सेवेत दिनांक नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचान्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS) लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१) श्री. सुबोध कुमार, भा.प्र.से. (सेवानिवृत्त)

२) श्री. के. पी. बक्षी, मा.प्र.से. (सेवानिवृत्त)

३) श्री सुधीरकुमार श्रीवास्तव, भा.प्र.से (सेवानिवृत्त)

४) समितीचे सचिव संचालक, लेखा व कोषागारे

👉👉👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈


सदर समितीने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजने बाबतची शिफारस / अहवाल शासनास ३ महिन्यात सादर करावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.rashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०३१४२००३१३६८०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

👉👉👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

👉जुनी पेन्शन योजना बाबत आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा

👉👉आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ? 

👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच वेतन/मानधन येथे तपासा 👈👈👈👈

सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close