मोठी बातमी! अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात..
Maharashtra Government Staff Strike:
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संपावर गेलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. जुनी पेन्शन योजनेबाबत (Old Pension Scheme) निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीन सदस्य समिती स्थापन केलेली आहे आणि याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती घटित केली आहे तरीसुद्धा कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाही आहे. प्रशासनाने संपावर गेलेल्या महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात संपावर गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी श्री अस्तिक कुमार पांडे यांनी थेट नोटिसी पाठवायला अखेर सुरुवात केली आहे.
त्याचप्रमाणे बेमुदत संपावर गेलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कामावर हजर राहण्याच्या सूचना या नोटीस मधून देण्यात आलेल्या आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्यभरातील सर्व सरकारी कर्मचारी यांनी बेमुदत संप ही हाक दिनांक 14 मार्च 2023 पासून दिली आहे आणि सध्या संप सुरूच आहे.
(Maharashtra state government employee strike) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तीन सदस्य समिती स्थापन केली असून संप मागे घेण्याचा आवाहन सर्व सरकारी कर्मचारी यांना केले आहे परंतु संपकरी निर्णय होईपर्यंत आपला संप मागे घेणार नाहीत आणि तो चालूच ठेवणार असल्याची भूमिका ठाम दिसत आहे त्यामुळे अखेर प्रशासनाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता कारवाई सुरू केलेली आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील कर्मचारी यांना माननीय जिल्हाधिकारी श्री आस्तिक कुमार पांडे यांनी थेट नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे इतर प्रशासकीय कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा नोटीस पाठवण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.
काय म्हटले आहे नोटिसमध्ये? Maharashtra employee strike for old pension scheme:
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री अप्पासाहेब शिंदे यांनी सर्व कारकून सर्व शिपाई तसेच सर्व महसूल सहाय्यक यांना नोटीस पाठवल्या आहेत त्यामध्ये स्पष्ट दिली आहे की राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना यांनी दिनांक 14 मार्चपासून बेमुदत संप बाबत शासनाला नोटीस दिल्या आहेत आणि या सदस्यांमध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथील त्याचप्रमाणे अधिनस्त इतर क्षेत्रीय कार्यालयातील सरकारी सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपणास नोटीस दिली जात आहे की भाग घेणे ही गैर वर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्त अभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल. केंद्र सरकार प्रमाणे काम नाही तर वेतन नाही हे धोरण राज्यशास्त्र ही अनुसरत असल्याचे आपल्या निदर्शनास. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्य बुद्धीच अनुसरून कर्तव्यावर उपस्थित राहावे अशी या नोटीस मधून कळविण्यात आलेले आहे.
👉👉👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈
दुसऱ्या दिवशीही संप सुरूच...(Old Pension Scheme)
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्च पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. सरकारने तीन सदस्य समिती नेमून सुद्धा कर्मचारी माघार घेण्यास तयार नाही आहे आणि सलग दुसऱ्या दिवशीही राज्यभरामध्ये भीमच संप हा सुरूच असल्याचे चित्र पाहायला दिसते आहे.(Government Employees strike)
👉👉आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ?
- ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार वाढला! सरकारचा मोठा निर्णय | Grampanchayat Staff Salary increase 2022
- Important: महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम/ बोनस/ वेतन/ पेन्शन मिळणार | Diwali Bonus-advance with Salary
- Read Also : राशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज बोनस मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Ration Card Holders Diwali Package Gift
👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच वेतन/मानधन येथे तपासा 👈👈👈👈
सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment