तलाठी भरती प्रक्रियेला गती द्यावी ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश | Talathi Bharti 2022 Latest Update

 तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश 

Talaati Bharti latest update news vikhe patil

मुंबई, दि. 17 : Talathi Bharti 2022 महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.

राज्यात विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12636 पदांपैकी 8574 पदे स्थायी असून, त्यापैकी उर्वरित 4062 पदे अस्थायी आहेत. राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्‍त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना 14 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

  महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. Talathi Bharti 2022 for 1000 post.

 श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. Maharashtra Shasan Nirnay

 गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.   

       तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.  

👉👉👉राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या दैनिक भत्ता (TA) दरात वाढीबाबत सुधारणा करणे बाबत शासन निर्णय-पहा GR दि.07.10.2022👈👈👈

००००  वर्षा आंधळे/विसंअ/17.10.22

सौजन्य : महासंवाद 

तलाठी भरती २०२२

talathi bharti 2022,talathi bharti,talathi bharti 2022 online form date,talathi bharti 2022 maharashtra,talathi bharti 2022 new update,talathi bharti new update,talathi bharti 2022 syllabus,talathi bharti 2022 online form date maharashtra,talathi bharti 2022 exam date maharashtra,talathi bharti 2021,talathi bharti update,talathi bharti question paper,talathi bharti 2022 new gr?,talathi bharti update 2022,talathi bharti syllabus,talathi bharti 2021 date
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close