NPS कर्मचाऱ्यांना जमा रकमेवर मिळाला निगेटिव्ह परतावा | जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी | Demand Old Pention Scheme:-
NPS System 2022: महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन बंद करून त्यांच्याकरता NPS सिस्टीम सुरू केलेली आहे. या NPS मध्ये 01 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी झालेले आहेत त्यांची मासिक पगारातून जी रक्कम NPS खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते ती रक्कम शेअर बाजार मध्ये गुंतवणूक केली जाते. अशीही शेअर मार्केट वर अवलंबून असलेली केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पेन्शन योजना सध्या 01 नोव्हेंबर 2005 पासून सरकारी नोकरी करत असलेल्या कर्मचारी तसेच अधिकारी यांना लागू आहेत.
NPS राष्ट्रीय पेन्शन योजना मुळे वजा 9.35% नुकसान
राष्ट्रीय पेन्शन योजना NPS System मुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे यावर्षी दिसून आलेले आहे. NPS धारक कर्मचाऱ्यांची त्यांच्या जमा असलेल्या एकूण रकमेच्या -09.35% आर्थिक नुकसान झाल्याची दिसून येत आहे.
त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी कर्मचारी आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारी मधून राष्ट्रीय पेन्शन योजना Tyer-1 च्या नावाखाली दरमहा कपात केली जाते सदाची रक्कम ही पुढील स्कीम मध्ये गुंतवली जाते.
- एसबीआय पेन्शन फंड मध्ये
- यूटीआय पेन्शन फंड मध्ये
- आणि एलआयसी पेन्शन फंड मध्ये ही रक्कम गुंतवली जाते.
सदाची रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली जात असल्याने सध्या शेअर मार्केट निश्चयांक गाठत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची जी जमा रक्कम आहे त्या रकमेचा -09.35% टक्के परतावा त्यांना मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची दिसून येत आहे.
NPS राष्ट्रीय पेन्शन योजनेचे नुकसान काय?
- जुन्या पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे अपदान रकमेचा फायदा मिळत नाही.
- राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून भविष्य निर्वाह खात्यामध्ये जी रक्कम जमा असते ती कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार काढता येत नाही.
- तसेच ओल्ड पेन्शन स्कीम Old Pention प्रमाणे कर्मचारी यांना त्यांची भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम मिळत नाही.
- राष्ट्रीय पेन्शन योजनेनुसार जी रक्कम मिळते ती अल्प प्रमाणात मिळते आणि काही प्रसेंटेजमध्ये मिळते.
- सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण रक्कम कर्मचाऱ्यास मिळत नाही पुन्हा शेअर मार्केटमध्ये काही प्रमाणात गुंतवले जाते.
अशाप्रकारे राष्ट्रीय पेन्शन योजनेचे नुकसान दिसून येत असल्याचे सोशल मीडियावर मेसेज फिरत आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
0 Comments
Thanks For Comment